फुंकून पीतो बियर
टून् झाल्यावर
जीभ सुटे मोकाट
मी आरूढ़ ढगांवर
खेकड्यासारखा वाकडा
टून् झाल्यावर
डावं-उजवं सारं एक
चालतो अधांतर
मला म्हणतात बेवडा
टून् झाल्यावर
सारे पीवट पेताड
खुद्द झोक्यावर
फास्ट रिवाईंड सिनेमा
टून् झाल्यावर
प्रश्न करा काहीही
उत्तर माझ्यावर
उद्धार सा-या जगाचा
टून् झाल्यावर
मीच भाई, सारं काही
एका इशा-यावर
BMW, फेरारी
टून् झाल्यावर
रात्र जाते सुपर फास्ट
चंद्र घोड्यावर
तारवटलेले डोळे
शुद्धीत आल्यावर
मेंदू गोटा २५ किलो
फिरतो गरगरगर.....
....रसप....
२४ एप्रिल २००९
चित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही !
माझ्या शब्दखुणा
- कविता (371)
- गझल (156)
- चित्रपट परीक्षण (151)
- मुक्तछंद (125)
- कविता - मात्रा वृत्त (108)
- गझल - गण वृत्त (96)
- लयबद्ध (64)
- कविता - गण वृत्त (59)
- गझल - मात्रा वृत्त (57)
- मुक्त कविता (49)
- भावानुवाद - कविता (42)
- ललित (30)
- विनोदी कविता (27)
- क्रिकेट (17)
- गीत (17)
- अक्षर छंद (16)
- व्यक्तिचित्रणपर कविता (12)
- सुनीत (4)
- हिंदी कविता (3)

Friday, April 24, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a comment
Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!