Saturday, April 23, 2011

मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते

भट सरांच्या गजलेतील "मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते" ह्या ओळीवरून पुढे लिहिली आहे. लहान तोंडी फारच मोठा घास आहे. गुस्ताखी माफ.मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते
दुनिया करते वा-वा ते, हृदयाचे खवले होते


आरोप असेही झाले मी रमलो स्वैराचारी
म्हणताना हाती प्याले घेऊन झिंगले होते

हातावरच्या रेषांना होती थोडीशी वळणे
गिरवून पुन्हा मी त्यांना आखून घेतले होते

क्षितिजावर आभाळाची शकले पडलेली होती
वेचाया हृदयाला ते आभाळ वाकले होते

कोणाला होती चिंता जगण्याची मरता-मरता
मृत्यूच्या वाटेवरती जगण्याचे इमले होते

ना जीत ऐकला कोणी, ना जीत पाहिला कोणी
आता म्हणती वेड्याला हे काय जाहले होते ?

....रसप....
२५ एप्रिल २०११

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...