Thursday, May 26, 2011

वैनगंगेच्या तीरावरती.. ("जंगल दूत"- २)
वैनगंगेच्या तीरावरती
छोटी छोटी गावं होती
जंगल होते अवतीभवती
हिंस्त्र श्वापदे तिथे राहती

सर्व माणसे गरीब साधी
शेती करती, गुरे पाळती
लाकुडतोडे होते काही
सुखे आपले जीवन जगती

एके दिवशी अद्भुत घडले
असे न कोणी कधी कल्पिले
"शेरखान" वाघाने तेथे
शिकार करण्या लक्ष वळविले!

एका लाकुडतोड्याचे ते
लहानगेसे पोर होते
वाघाच्या हल्ल्याला चुकवुन
जंगलामध्येच गेले होते..

'शेरखान' तो वाघ लंगडा
शिकार हुकता क्रोधित झाला
शोधत शोधत त्या पोराला
डरकाळ्या तो देऊ लागला!

पोर छोटे निर्भय होते
झाडीमधुनी धावत होते
चढून गेले टेकाडावर
तिथे लांडग्याचे घर होते.......


....रसप....
२६ मे २०११


क्रमश:


"जंगल दूत - १"
.

1 comment:

  1. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...