Sunday, May 22, 2011

परके

"मराठी कविता समूहा"च्या "अशी जगावी गझल" ह्या उपक्रमासाठी लिहिलेली तिसरी रचना -


सगळे हळूच येथे रडले जरा जरा
लपवून चेह-याला हसले जरा जरा

नयनांत अश्रु होते मुखडा उदासही
पण ढोंगही मला ते कळले जरा जरा

हृदयात मी जपावे तिजला कशामुळे
म्हणतो असे तरीही जपले जरा जरा

नशिबास दोष देणे जमलेच ना कधी
खटके उगाच माझे उडले जरा जरा

अपुल्याच माणसाला परके कसे म्हणा
परकेच आपलेसे वदले जरा जरा

दगडास ना कधीही दिसणार त्या 'जितू'
परि देवळासमोरी नमले जरा जरा


....रसप....
२१ मे २०११

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...