Thursday, October 13, 2011

मी नसतो तेव्हा.. (थोडासा "माज"..!! )मी नसतो तेव्हा पाउल माझे शोधत सारे फिरती
पाउलरेषा पोहोचवती त्या अनंत क्षितिजापुढती


मी नसतो तेव्हा सारे माझ्या जागी बसून बघती
अन जमलेल्या मैफलीतसुद्धा रंग-जान ना मिळती !


मी नसतो तेव्हा तप्त कोरडे वारे जळजळ करती
खदखदत्या संतापाला उधळत दिशा-दिशांना फिरती


मी नसतो तेव्हा नकली हासुन कळ्या उदासी फुलती
दवबिंदू म्हणते दुनिया पण ते अश्रू चमचम सजती


मी नसतो तेव्हा शब्दच माझे सर्वदूर दरवळती
हे खुळे-दिवाणे शायर त्यांना गुंफुन कविता म्हणती


....रसप....
१३ ऑक्टोबर २०११

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...