Saturday, February 25, 2012

इजाजत (१९८७) - चित्रपट कविता


एका आंधळ्या दिवशी
घर 'वेटिंग रूम' बनलं
आणि आज ह्या डोळस रात्री
'वेटिंग रूम' मध्ये घर बनलं

तो - बिना फोटोच्या चौकटीसारखा
ती - बिना चौकटीच्या फोटोसारखी
आणि रात्र - फोटोत रंग भरणारी
बरसणारी, बरसवणारी..

गुंते सुटतील, प्रश्न उकलतील...
पण ह्या डोळस रात्रीनंतर
परत आंधळा दिवसच येणार..
पुढील प्रवासासाठी दोघंही निघणार

ह्यावेळी निरोप घेतला जाणार का ?
ह्यावेळी निरोप दिला जाणार का ?

रात्रभर मनसोक्त बरसून आकाश मोकळं होईल...
पुन्हा एकदा घराला 'घर'पण कधी येईल..??


....रसप....
२० फेब्रुवारी २०१२

1 comment:

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...