Saturday, May 12, 2012

"बी ग्रेसफुल"


'माझ्या पाठीच्या
कण्यातील कुंडलीत,
आपल्या चरणगतीचा मोक्ष
तपासून पाहणाऱ्या
शहमृगास;
आणि मेंदूतील चंद्रामृताच्या
तळ्यात,
आपल्या सुगंधतृष्णेची
जोखीम सांभाळणाऱ्या
कास्तुरीमृगास (ही)
ओल्या वेळूची बासरी
अर्पण '

अशा विलक्षण शब्दलालित्याने सजलेली आणि अपूर्व भावबंध गुंफणारी आपली ७ ललित साहित्याची आणि ५ कवितासंग्रहांची अभूतपूर्व संपदा रसिकांना अर्पण करत
‘लख्ख निरंजन माझी वाणी
अलख निरंजन माझी कविता’
असं आपल्या कवितेचं आणि वाणीचं वर्णन करणारा 'घनांनी वाकलेला' आणि 'फुलांनी झाकलेला' संध्यामग्न पुरुष आपल्या काव्याचा आणि साहित्याचा समृद्ध ठेवा आपल्या झोळीत घालून
'डोंगरी दिसे कल्लोळ
अलीकडले सर्व निवांत
निजतात कसे हे लोक
सरणाच्या खाली शांत?'
असं विचारून स्वत: त्याच मार्गाने चंद्रमाधवीचे प्रदेश काबीज करण्यासाठी अनंताच्या प्रवासाला निघून गेला. १० मे रोजी या सांध्यपर्वाच्या यात्रिकाचा, म्हणजेच दु:खाचे महाकवी म्हणून सुप्रसिद्ध असणाऱ्या ग्रेस यांचा जन्मदिवस.
त्यानिमित्त त्यांच्या स्मृतींना उजळणारी आपली ही छोटीशी भावपूर्ण श्रद्धांजली."मराठी कविता समुह", ग्रेस यांच्या स्मृतीस वाहिलेला  "बी ग्रेसफुल" हा अंक  आपणासमोर सादर करत आहे. हा अंक मेलमध्ये मिळविण्यासाठी mkebooks@marathi-kavita.com या पत्त्यावर मेल करा.

आत्ताच्या आत्ता हा अंक डाऊनलोड करण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी लावा:
http://www.marathi-kavita.com/sites/default/files/ebookpdfs/Kawita-Wishwa-Be-Gressful-10-5-2012.pdf

हा अंक कसा वाटला हे आम्हाला mkebooks@marathi-kavita.com या पत्त्यावर नक्की सांगा. किंवा तुम्ही mkmoderators@gmail.com  या पत्त्यावरही अभिप्राय पाठवू शकता. हा अंक आवडल्यास आपल्या मित्रांना पाठवायला विसरू नका. शेयर करा, लाईक करा."


संचालक मंडळ
मराठी कविता समूह

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...