Wednesday, May 27, 2015

लगोरी

एक मनोरा उभारला मी
डगमगला पण सावरला मी

रोरावत आलास कुठुन तू
ध्वस्त मनोरा केला..
ठिकऱ्या ठिकऱ्या केल्या..
दूर दूर पसरवल्या..

पण खेळ इथे संपला न होता!

डोळ्यांदेखत तुझ्या नव्याने
आणि निरंतर चुकवत मारा
पुन्हा एक बांधला मनोरा
दिली जोरकस हाळी..

लगोssरी लगोssरी लगोssरी !

खेळ संपला नाही अजुनी
जोपर्यंत ना थकवा येतो
तुला, मला वा दोघांनाही
अशीच खेळू रोज लगोरी..

....रसप....
२१ मे २०१५

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...